बुद्धपौर्णिमेला थायलंड ला का भेट द्यावी. नक्की वाचा.
वैशाख बुद्ध पौर्णिमा 2018 व 2019
वैशाख बुद्ध पौर्णिमा गौतम बुद्धांच्या 3 महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकते
1) त्यांचा जन्म
2) त्यांची ज्ञानप्राप्ती
3) त्यांचा मृत्यू
आज सर्वाधिक पाहिलेले थायलंड चे सण
1. चक्री दिवस
2. सोगक्रंप उत्सव
3. वैशाख बुद्ध पौर्णिमा
भारतात बुद्धांचा जन्म 2500 वर्षांपूर्वी झाला. ते एक श्रीमंत राजपुत्र होते, पण त्यांनी ऐशो आराम आणि विलासयुक्त जगणं सोडून, आयुष्याचे जटिल सत्य शोधण्यासाठी ते राणा वनात ऋषीमुनी सोबत निवास करायचे. त्यांना मानवी जीवनाचे दुःख पाहून खूप वाईट वाटत असे. त्यांनी आपली ध्यान साधना एका पिंपळाच्या झाडाखाली सुरू केली, ज्याला आज आपण बोधीवृक्ष म्हणतो. वयाच्या 35 व्या वर्षी त्यांना बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली आणि नंतर त्यांनी बौद्ध धम्माच्या सिद्धांताची निर्मिती करून पुढचे 45 वर्ष धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, वयाच्या 80 व्या वर्षी, त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले.
थायलंड मध्ये विविध धम्म अनुयायी, बुद्ध विहारांना भेट देऊन आपले श्रम, दान आणि विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या हातून कुशल कम्म घडावे याचा प्रयत्न करतात. तिथे ते बौद्ध धम्माशी पुन्हा जुळतात, धम्म वाणी ऐकतात, ध्यान करतात, अन्न दान करतात, काही लोक आपले नकारात्मक कम्म संपवण्यासाठी पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करतात.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, थायलंड च्या कायद्यानुसार, थायलंड मध्ये दारू विकण्यावर बंदी आहे, त्यामुळे बरेच दारू चे दुकानं त्या दिवशी बंद असतात. बरेच उत्सव हे कौटुंबिक आणि धार्मिक असतात, पण पर्यटकांना बऱ्याच विहारांना भेट देण्याची परवानगी असते. बँकॉक मध्ये असलेल्या 2 महत्वाचे विहार म्हणजे
वॅट फो, जे बँकॉक मधले सर्वात जुने बुद्ध विहार आहे. हे विहार 7 व्या शतकापासून अस्तित्वात आहे, परंतु 1801 मध्ये राजा राम यांनी हे पुनर्निर्माण केले व त्याचा विस्तार केला. राजा रामच्या अस्थी या प्रसिद्ध विहाराच्या आवारात असलेल्या बुद्धांसमावेत ठेवलेल्या आहेत, ज्याचा अर्थ बुध्दांने त्यांच्या निर्वाणात प्रवेश केला आहे. तेथील वास्तुकला अत्यंत अलंकृत, रंगीत आणि जटिल आहे.
वॅट फ्राथर्ट दोई सुथेप. येथे दरवर्षी मोठ्या वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या उत्सवाचे आयोजन केले जाते. मेणबत्तीच्या प्रकाशात, उपासक आणि उपासीका "भोते" चॅपल घेतात. ते धूपाची कांडी आणि कमळाच्या कळ्या घेऊन विहाराभोवती प्रदक्षिणा घालतात. ह्या विहारातून शहराचे अनोखे व विहंगमय दृश्य पाहता येते, आणि या विहारात बुद्धांचे अवशेष 4 शतकांपासून ठेवले आहेत.
No comments